नागपूर सिटी मल्टिस्टेट सहकारी क्रेडिट सोसायटी कॉर्पोरेट ऑफिस – मेडिकल स्क्वेअर रोड, नागपूर
नागपूर सिटी मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, नागपूर मुख्यालय येथे दहावी व बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. संस्थापक अध्यक्ष मा. श्री. जितेंद्रजी वासनिक साहेब यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान व मार्गदर्शन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला
नागपूर सिटी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडतर्फे भव्य दहीहंडी उत्सव २०२५ उत्साहात संपन्न! १७ ऑगस्ट २०२५ रोजी छोटा ताजबाग, नागपूर येथे आयोजित दहीहंडी उत्सवाला लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी, बहुगुणी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि महाराष्ट्राचे आमदार श्री. मोहन मते यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले