View in ENGLISH    |      

नमस्कार,
असं म्हणतात की पैशांना पाय असतात, आलेले पैसे नकळत कुठे निघून जातात ते कळतही नाही. अनेकांना याचा अनुभव नक्कीच असणार. मान्य आहे की खर्च योग्यच होतो मात्र प्रत्येक वेळेला फक्त आजचा विचार करून नाही चालत. उद्याचा विचार करायला हवा, भविष्यासाठी तरतूद करायला हवी.

आपण हा विचार करायला हवा की ‘आज आपण कमावतोय, स्वास्थ्यही चांगले आहे मात्र काही वर्षांनंतर वयोमानानुसार आपल्याला काम करणं शक्य होणार नाही, आज जसे पैसे कमवत आहोत तसे तेव्हा कदाचित होणार नाही. तेव्हाच खर्चही आजपेक्षा जास्त असेल… तेव्हा काय आणि कसे करणार?’
हाच विचार करून प्रत्येकाने अगदी आजपासूनच, आपल्या कमाईतून शक्य होईल तेवढी बचत करायलाच हवी आणि योग्य ठिकाणी गुंतवायलाही हवी… म्हणजे त्या बचतीवर अधिक उत्पन्न देखील मिळेल. असं म्हणतात की कुठलीही गोष्ट आपण सलग २१ दिवस केली तर ती सवय होते; तसेच स्वतःला बचतीचेही आहे. सातत्याने बचत करायला सुरुवात केली तर नकळत ती सवय लागतेच आणि आपल्याही नकळत ती बचत एवढी मोठी होते की आपले भविष्य सुरक्षित होते. काय मग… करणार ना आजपासून बचतीला सुरुवात?

तुम्हाला यादरम्यान साथ देण्यासाठी, तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुमचा हक्काचा बचत मित्र म्हणजेच तुमची नागपूर सिटी मल्टीस्टेट २४x७ तुमच्या बरोबर आहे. कुठलीही अडचण अथवा शंका असेल तर मी आणि आमची टीम आहे. कुठल्याही शाखेला भेट द्या, आम्हाला आवडेल तुमच्याशी बोलायला, तुमच्या अडचणी जाणून घ्यायला आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी तुमच्या बरोबर उभं राहायला!

- श्री. जितेंद्र वासनिक
संस्थापक चेअरमन, नागपूर सिटी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लि., नागपूर

Nagpur City Multistate
Top