प्रत्येकाच्या आर्थिक स्थैर्यासाठी बचत आणि गुंतवणूक आवश्यक असते. अनेकांना याचे महत्व आहे मात्र बचत करणं अवघड जाते, आर्थिक नियोजन कोलमडते आणि त्यातून अनेक आर्थिक समस्या निर्माण होतात. याचा सखोल विचार करून प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य मिळावे, त्याचे भविष्य सुरक्षित असावे या उदात्त हेतूने सन 2014 साली नागपूर सिटी मल्टीस्टेट कॉ-ऑपेराटीव्ह सोसायटीची स्थापना झाली.
संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. जितेंद्र वासनिक साहेब यांच्या मार्गदर्शनाने सर्व सभासदांना ग्राहकाभिमुख सेवा देण्यात संस्थेचे सर्व कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्येकाच्या कष्टाचे पैसे सुरक्षित राहावे यासाठी संस्थेमध्ये नियमबद्ध कामकाज केले जाते. गुंतवणुकीवर कुठलेही अवास्तव उत्पन्नाचे आमिष न दाखवता योग्य आणि सुरक्षित गुंतवणुकीचे पर्यायच सभासदांना उपलब्ध करून दिले जाते आणि यासाठी नागपूर सिटी मल्टीस्टेटचा विशेष उल्लेख केला जातो. त्याचप्रमाणे तत्पर कर्ज आणि सर्व आधुनिक सेवा सुविधा पुरविण्यासाठीही संस्था अग्रेसर आहे.
आज संस्थेच्या नागपूर, मुंबई येथे अनेक शाखा असून लाखो ग्राहकांना अविरत सेवा पुरविल्या जातात. संस्थेची आजवरची प्रगती म्हणजेच सर्व सभासदांनी-ग्राहकांनी टाकलेल्या विश्वासाची आणि आपुलकीच्या नात्याची पावतीच आहे.
भविष्यामध्ये संस्थेच्या कार्याचा विस्तार करत प्रत्येकाला आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी प्रयत्नशील आहेत आणि यासाठी तुमचीही साथ लाभेल यात शंका नाही.